श्री. समीर सुरेशराव देशमुख हे वर्धा जिल्ह्यातील युवा व प्रभावी नेते म्हणून ओळखले जातात. ते जनतेच्या भल्यासाठी निःस्वार्थपणे प्रयत्नशील आहेत. त्यांची सामाजिक बांधिलकी अनेकांना प्रेरणा देते. वर्धा जिल्हा प्रगतीपथावर नेण्यासाठी ते कार्यरत आहेत आणि जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहेत.
समीर सुरेशराव देशमुख हे बापूराव देशमुख कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, सेवाग्राम, वर्धा चे संचालक असून यशवंत ग्रामीण शिक्षण संस्था, वर्धा चे सदस्य आहे. त्यांचे आजोबा श्रद्धेय बापूरावजी देशमुख उर्फ दाआजी हे स्वतंत्रसेनानी होते. दाआजी हे हिंगणघाट (१९५२), आर्वी (१९५७) व वर्धा (१९६२) या मतदारसंघाचे आमदार होते. त्याचप्रमाणे वडील सुरेश बापूरावजी देशमुख हे महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, मुंबई. व बापूरावजी देशमुख शेतकरी सहकारी सूतगिरणी, वर्धा आणि बापूरावजी देशमुख शेतकरी सहकारी साखर कारखाना चे अध्यक्ष होते.
पसमाजातील अनिष्ठ, जाचक परंपरां विरोधात लोकप्रबोधनाचा वसा घेतलेल्या प्रबोधनकार ठाकरे यांच्या घरी बाळ ठाकरे यांचा जन्म २३ जानेवारी १९२६ रोजी पुणे येथे झाला. त्या काळात सुरु असलेल्या स्वातंत्र्य लढ्याच्या माध्यमातून मनावर कोरली जात असलेली प्रखर राष्ट्रभक्ती, घरातच होत असलेले प्रबोधनकारांचे संस्कार, आणि पुढे घडलेली संयुक्त महाराष्ट्राची चळवळ यांतून बाळ ठाकरे यांची वैचारिक दिशा स्पष्ट होत बाळासाहेब ठाकरे नामक वादळ महाराष्ट्राच्या राजकारणात उदयास आले.
अधिक वाचाप्रखर हिंदुत्वाचा झंजावात आणि मराठी मनाचा मानबिंदू असणाऱ्या शिवसेनेचे खंबीर नेतृत्व म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे. हिंदूह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या नेतृत्वाची धुरा समर्थपणे पेलत राष्ट्रीय राजकारणात शिवसेनेचा भगवा तितक्याच डौलाने फडकवत ठेवण्याचे कार्य पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे समर्थपणे पार पाडत आहेत. सत्ताधीशांच्या लोक विरोधी कृत्यावर आपल्या शैलीत टिप्पणी करून सत्ताधीशांचीही भंबेरी उडविण्याची शक्ती बाळगताना लोकहितकारी कृत्य, निर्णयांची प्रसंगी प्रशंसा करीत राष्ट्रीय आणि राज्याच्या राजकारणात आपले विशेष स्थान पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे बाळगून आहेत.
अधिक वाचाशिवसेना प्रणित युवकांची संघटना असणाऱ्या युवासेनेचे प्रमुख आदित्यसाहेब ठाकरे हे शिवसेनेचे युवा नेतृत्व. घरातच नेतृत्वाचे बाळकडू घेतलेले आदित्य ठाकरे महाविद्यालयीन जीवनापासूनच आपल्या नेतृत्व शैलीची छाप पाडत पुढे राजकारणात आपले नेतृत्व गुण सिद्ध करीत आज युवकांचे प्रश्न ज्वलंतपने मांडत तरुणांना आपला हक्क मिळवून देण्यात मोलाची कामगिरी बजावत आहेत. विद्यापीठासारख्या शैक्षणिक संस्थांवर आपल्या विशेष कार्यशैलीतून युवासेना प्रणित संघटनेचे प्रतिनिधी मंडळाची सत्ता स्थापित करून शैक्षणिक क्षेत्रात आमुलाग्र बद्दल घडविण्यासाठी सतत प्रयत्नशील असणारे आदित्य ठाकरे यांची शिवसेनेच्या नेतेपदी शिवसैनिकांच्या आग्रहाने नियुक्ती करण्यात आली.
अधिक वाचा