श्री. समीर सुरेशराव देशमुख हे वर्धा जिल्ह्यातील युवा व प्रभावी नेते म्हणून ओळखले जातात. ते जनतेच्या भल्यासाठी निःस्वार्थपणे प्रयत्नशील आहेत. त्यांची सामाजिक बांधिलकी अनेकांना प्रेरणा देते. वर्धा जिल्हा प्रगतीपथावर नेण्यासाठी ते कार्यरत आहेत आणि जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहेत.
समीर सुरेशराव देशमुख हे बापूराव देशमुख कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, सेवाग्राम, वर्धा चे संचालक असून यशवंत ग्रामीण शिक्षण संस्था, वर्धा चे सदस्य आहे. त्यांचे आजोबा श्रद्धेय बापूरावजी देशमुख उर्फ दाआजी हे स्वतंत्रसेनानी होते. दाआजी हे हिंगणघाट (१९५२), आर्वी (१९५७) व वर्धा (१९६२) या मतदारसंघाचे आमदार होते. त्याचप्रमाणे वडील सुरेश बापूरावजी देशमुख हे महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, मुंबई. व बापूरावजी देशमुख शेतकरी सहकारी सूतगिरणी, वर्धा आणि बापूरावजी देशमुख शेतकरी सहकारी साखर कारखाना चे अध्यक्ष होते.यरत आहेत आणि जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहेत.
त्यांचे वडील प्रा. सुरेशभाऊ देशमुख आणि आजोबा श्रद्धेय बापुरावजी देशमुख यांनी दिलेला वारसा ते कुशलतेने जपुन शिक्षण, सहकार, क्रीडा, सांस्कृतीक आणि सामाजिक कार्यात मोलाचे कार्य करत आहे.